Surprise Me!

फडणवीस: रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी वेळ | Auto and Taxi Drivers | Marathi Language

2026-08-24 0 Dailymotion

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर ऑटो आणि टॅक्सी चालकांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. हिंदी भाषिक चालकांना मराठी भाषेचे तज्ज्ञ बनवण्याचा आग्रह नसून त्यांच्या कामासाठी आवश्यक असलेली बोलचालीपुरती मराठी यावी, एवढीच अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

चालकांना मराठी शिकवण्याचे प्रयत्न सुरू असून त्यांच्या मागणीनुसार यापूर्वीही दोन वेळा मुदत वाढवण्यात आली आणि आता तिसऱ्यांदाही वेळ देण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. पुढेही चालकांनी मराठी शिकण्यासाठी आणखी वेळ मागितल्यास मुदत वाढवून देण्याची सरकारची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुती सरकार भाषेच्या आधारावर कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. अनेक हिंदी भाषिक कुटुंबे तीन पिढ्यांपासून महाराष्ट्रात राहत असून ते महाराष्ट्राच्या संस्कृतीत मिसळले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

#DevendraFadnavis #MarathiLanguage #मराठीभाषा #AutoDrivers #TaxiDrivers #Mahayuti #MaharashtraNews #MarathiNews #asianetnewsmarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.